मानकी रोडवर आढळला इसमाचा मृतदेह

पत्नीच्या आजारपणामुळे मानसिक तणावात असल्याची माहिती

0

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या मानकी रोडवर एक इसम मृतावस्थेत आढळून आला. माणिक उद्धव धांडे असे मृतकाचे नाव आहे. सकाळपासून ते घरून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोधाशोध केला. मात्र दुपारी त्यांचा मृतदेहच आढळून आला.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की मृतक माणिक उद्धव धांडे (55) हे आधी भीमनगर येथे राहत होते. त्यांनी दुसरा विवाह केला. त्यांतर ते दुसरी पत्नी आशा व मुलगी गायत्री यांच्यासोबत सेवानगर येथे राहत होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून रिता नावाची मुलगी आहे. आज सोमवारी दिनांक 5 जुलै रोजी 11.50 वाजताच्या सुमारास रिता हिला तिची सावत्र बहिण गायत्रीचा कॉल आला. तिने रिताला सांगितले की वडील सकाळी 5 वाजता कुणालाही न सांगता घराबाहेर गेले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याबाबत त्यांनी घराशेजारी तसेच नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र ते आढळून आले नाही. एखादी तासांनी त्यांना एका इसम मानकी रोडवर पडून असल्याचे कळले. त्यावरून रिता तिथे गेली असता ते तिचे वडील माणिक होते. मुलींनी त्वरित त्यांच्या वडिलांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुस-या पत्नीच्या आजारपणामुळे मानसिक तणावात !
रिताच्या म्हणण्यानुसार माणिक यांची दुसरी पत्नी व रिताची सावत्र आई आशा हिला कर्करोग आहे. त्यामुळे माणिक नेहमीच तणावात राहत होते. या मानसिक तानावमुळेच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला असावा. असा अंदाज तिने वर्तवला आहे.

मृतकाची मुलगी रिता हिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी माणिक यांच्या मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.