हे काय सुरू आहे वणी परिसरात? पुन्हा आढळला एक मृतदेह

दीप्ती टॉकीज जवळील घटना, उष्माघात की आणखी काही....

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत आणखी एक मृतदेह आढळला आहे. सोमवारी दुपारी शहरातील दीप्ती टॉकीज लगत एका अनोखळी इसमाचा (वय अंदाजे 50-55) मृतदेह आढळला. सदर मृतदेहाच्या अंगात मळकट रंगाचे शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट व कथीया रंगाची बनियन आहे. उंची 5 फूट 8 इंच असून बांधा सडपातळ आहे. मृत इसमाच्या खिशात खर्राच्या पुड्या होत्या. या वर्णनाचा कुणी इसम बेपत्ता असल्यास वणी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा 8788577840 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वणी पोलीस ठाण्या तर्फे करण्यात आले आहे. सदर इसमाचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी उष्माघाताने हा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. शुक्रवारी नायगाव शेतशिवारात एक मृतदेह आढळला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी ही दुसरी घटना समोर आली आहे. तर रविवारी मांगली येथे एक मृतदेह आढळला होता. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.