42 तासानंतर अखेर त्या युवकाचा मृतदेह मिळाला

मंगळवारी निर्गुडा नदीत घेतली होती उडी, दोन दिवसपूर्वीच कारागृहातून झाली होती सुटका

जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवार 21 सप्टें. रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान दुथडी वाहत असलेली निर्गुडा नदीत उडी घेणाऱ्या शास्त्रीनगर येथील त्या युवकाचा अखेर आज गुरुवार 23 सप्टें. रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान एक किलोमीटर अंतरावर मृतदेह मिळाला. फय्याज अली असगर अली (38) रा. शास्त्रीनगर वणी असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळ गाठून मृतदेहाच पंचनामा करून शवविच्छेदन साथी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक फय्याज अली हा गुन्हेगारी प्रवृतिचा असून आत्महत्येच्या दोन दिवासपूर्वीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. जीवघेणा हल्ला करण्याचा आरोपावरून त्याला कारागृहाची शिक्षा झाली होती. घटनेच्या दिवशी सकाळी मृतक फय्याज अली यांचा घरच्या लोकांसोबत कडक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी फय्याज अली यांनी वणी पोलिस स्टेशनमध्ये कुटुंबीय त्रास देत असल्याची तक्रार नोंदविली. पोलिसानी कार्यवाही न केल्यास मी आत्महत्या करीन अशी खुली धमकी देऊन फय्याज पोलिस ठाण्यातून निघून गेला.

फय्याज यांनी तक्रार दिल्याची माहिती मिळताच त्याचे वडील, आई, पत्नी यांनीही फय्याज विरुदड भांडण व मारझोड करीत असल्याची तक्रार नोंदविली. घरगुती भांडण असल्यामुळे पोलिसानी नॉन कॉग्जिबल गुन्हा दाखल करून फिर्यादी यांना परत पाठवून दिले.

वडील, आई व पत्नीने आपल्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळताच फय्याजचा पारा भडकला. तेव्हा सायंकाळी 4 वाजता दरम्यान त्यांनी पुन्हा घरी भांडण केले व मी आत्महत्या करून तुम्ही सर्वाना फसवितो अशी धमकी देऊन नदीकडे निघाला. मोक्षधाम रस्त्यावर असलेल्या नदीच्या पुलावर त्यांनी कपडे, चप्पल काढून ठेवले व दुथडी वाहत असलेल्या नदीच्या पाण्यात फय्याज यांनी उडी मारली.

काही वेळाने फय्याजची बहीण त्याला शोधत शोधत नदी पुलावर आली तेव्हा तिने पुलावर असलेले कपडे व चप्पल त्याचे भाऊ फय्याजचे असल्याचे ओळखले. तेव्हा पासून पोलिस फय्याजचा शोध घेत होती. मात्र गुरुवारी सकाळी 11 वाजता दरम्यान रामघाट जवळ झाडयाझुडप्यात फय्याजचा छिन्नभिन्न अवस्थेत मृतदेह मिळाला. पोलिसानी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केले असून जमादार डोमाजी भादीकर पुढील तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव

Comments are closed.