जितेंद्र कोठारी, वणी: शेतीच्या कुंपणाला वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊ एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील बोर्डा येथे आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कुमारी रमय्या परस्ते (18) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी शेतमालक नितीन ढेंगळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतक कुमारी रमय्या परस्ते (19) ही मुळची मध्यप्रदेशातील खमरिया जि. डिंडोरी (म.प्र.) येथील रहिवाशी होती. बोर्डा येथे रमेश गणपत ढेंगळे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात मृतक कुमारी रमय्या परस्ते ही तिच्या काकासह मजुरी करायची व शेतातील गोठ्यातच नातेवाईकासह राहत होती.
वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी गावातीलच शेतकरी नितीन विजय ढेंगळे (37) यांनी शेतीच्या कुंपणाला विद्युत करंट लावला होता. पहाटे 5 वाजताच्या सुमारास कुमारी प्रात:विधीसाठी गेली होती. दरम्यान तिचा नितीन ढेंगळे यांच्या शेताला लावलेल्या कुंपणाच्या जिवंत तारांना स्पर्श झाला. या तारांमध्ये असलेल्या विजेचा करंट लागून कुमारीचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतमालक नितीन ढेंगळे शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. पोलीस पाटलांनी याबाबतची माहिती वणी पोलीस स्टेशनला दिली.
मृतक कुमारीचे मामा दीपचंद धरमसिंग मरकाम यांच्या तक्रारीवरून आरोपी शेतमालक नितीन विजय ढेंगळे यांच्याविरोधात भादंविच्या कलम 304 (ii), 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि आनंदराव पिंगळे करीत आहे.
दोन तीन महिन्याआधीच कुमारीचे मामा दीपचंद यांनी कुमारीला मध्यप्रदेश येथून तिच्या मुळ गावाहून मजुरीसाठी बोर्डा येथे आणले होते. कुमारी तिच्या काकासह रमेश ढेंगळे यांच्या शेतात मजुरी करायचे व गोठ्यात राहायचे. तिचे मामा दुस-या शेतात काम करतात. कुमारीच्या मृत्यूमुळे तिचे काका, मामा यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे देखील वाचा: