बैलबंडीच्या उभारीने हल्ला केलेल्या वृद्धाचा मृत्यू

भालर येथील घटना, उपचारादरम्यान मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: जवळील भालर येथे 7 ऑक्टो. रोजी मारहाणीत गंभीर जखमी वृद्ध व्यक्तीचे उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू झाला. नामदेव घुलाराम बांदुरकर असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांच्यावर आरोपी आशिष मधुकर वरारकर (35) रा. भालर याने मद्यधुंद अवस्थेत बैलबंदीच्या उभारीने हल्ला केला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीच्या गुन्ह्यात भादंविची कलम 302 जोडण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार दि. 7 ऑक्टोबर रोजी हा दारूच्या नशेत असताना त्याचे मित्र प्रतीक गौरकार यांनी त्याला घरी सोडले होते. मात्र मद्यधुंद अवस्थेत घरी सोडल्याचा राग आरोपी आशिषला आला होता. या रागातून आरोपी काही वेळाने प्रतीक गौरकारच्या घरी पोहचला. तेव्हा प्रतिकचे आजोबा नामदेव बांदुरकर हे घराबाहेर उभे होते. त्यांनी आशीषला तू इथे कशाला आला’ असे विचारले असता आरोपीने बैलबंडीची उभारी काढून त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वृद्ध नामदेव गौरकार हे खाली कोसळले. तेव्हा आरोपीने पुन्हा लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी नामदेव बांदुरकर यांना उपचाराकरिता चंद्रपूर येथे दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 11 ऑक्टो. ला त्यांचा मृत्यू झाला. मृतकाचे नातू प्रतीक गौरकार यांच्या फिर्याद वरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 324 व 504 अनव्ये दाखल गुन्ह्यात कलम 302 जोडून वाढ केली आहे. तसेच आरोपी आशिष मधुकर वरारकर यास भालर येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पीएसआय प्रवीण हिरे आणि जमादार प्रकाश बोरलेवार करीत आहे.

हे देखील वाचा:

महाराष्ट्र बंदला वणीत संमिश्र प्रतिसाद

50 एकरची सोलर झटका मशिन अवघ्या 8490 रुपयांमध्ये

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.