जैताई देवस्थान येथे भगवान महादेव मूर्ती सौंदर्यीकरण व वॉटर फाउंटन लोकार्पण सोहळा  

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीचा समाजोपयोगी उपक्रम

जितेन्द्र कोठारी, वणी : वणी शहराची आराध्यदेवी माँ जैताई मंदिराच्या प्रांगणात सौन्दर्यीकरण करण्यात आलेली  भगवान महादेव यांची प्रतिमा व आकर्षक वॉटर फाउंटनचा लोकार्पण सोहळा रविवार 15 ऑक्टो. रोजी आमदार संजीवरेड्डी बोद्कुरवार यांचे हस्ते पार पडणार आहे. सायंकाळी 5 वाजता आयोजित लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष जैताई देवस्थान समितीचे अध्यक्ष माधवराव सरपटवार तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव मनु महाराज तुगनायात राहणार आहे.

Podar School 2025

जैताई माता मंदिरात नवरात्री उत्सव उत्साहाने साजरा केल्या जातो. नवरात्रीच्या दरम्यान दररोज हजारो भाविक देवीदर्शन व मातेची ओटी भरण्यासाठी मंदिरात येतात. शहरात समाजकार्यात अग्रेसर असलेले रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीतर्फे जैताई मंदिर प्रांगणात विराजित भगवान महादेव यांच्या प्रतिमेचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. तसेच आकर्षक वॉटर फाउंटनचे निर्माण करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या नवरात्री उत्सवात भाविकांना मंदिर परिसरात नवीन अनुभव बघायला मिळणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भगवान महादेव मूर्ती व वॉटर फाउंटन लोकार्पण सोहळयात जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. आशिष गुप्ता, सचिव रोटे. अश्विन कोंडावार, प्रोजेक्ट डायरेक्टर रोटे. अचल जोबनपुत्रा, रोटे. विनोद बाजोरिया, रोटे. रुद्र ताटेवार यांनी केले आहे.

Comments are closed.