कोलगाव (मारेगाव) येथील वॉटर फिल्टर प्लांटचे लोकार्पण
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते उद्घाटन
जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथे उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण संयंत्रचे लोकार्पण शनिवार 16 ऑक्टोबर रोजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. खनिज विकास निधी अंतर्गत 9 लाख रुपयांच्या निधीतून कोलगाव येथे वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आले आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने
साकार झालेल्या जलशुद्धीकरण सयंत्राच्या लोकार्पण प्रसंगी पाऊस सुरु असताना मोठ्या संख्येत गावातील नागरिक कार्यक्रमात हजर होते.
तालुका मुख्यालयापासून फक्त 3 किमी अंतरावर स्थित कोलगाव विकास कामापासून कोसो दूर आहे. स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधीच्या उदासीन धोरणामुळे गावात आवश्यक सोयी सुविधासुद्दा उपलब्ध नव्हते. मात्र सरपंच आभिशा राजू निमसटकरच्या नेतृत्वात नवीन ग्रामपंचायतने अनेक विकास कामे सुरु केले आहे. यात गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्द पाणी मिळावे याउद्देशाने जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आले आहे.
मुसळधार पावसातही गावक-यांची उपस्थिती
विशेष म्हणजे लोकार्पण सोहळा सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र त्यावेळीही गावक-यांचा उत्साह कायम होता. गावक-यांनी मिळेल त्या आडोशाची मदत घेतली. तर अनेक लोक छत्री घेऊन या कार्यक्रमात उपस्थित झाले. पाऊस असतानाही पुरुषांसह महिला, तसेच वृद्धांनीही या कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
जलशुद्धीकरण संयंत्र लोकार्पण प्रसंगी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, सरपंच अभिषा राजु निमसटकर, उपसरपंच प्रदीप वासाडे, ग्रामसेवक अनिल रामटेके, ग्राम पंचायत सदस्य जया जुनगरी, रवीता अवताडे, रविंद्र आत्राम, गुरुदास घोटेकार सामाजीक कार्यकर्ते संजय पारखी, राजु आवारी, चेतन आवारी, संतोष मेश्राम यांची उपस्थीत होती. लोकार्पण सोहळ्याचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन राजू निमसटकर यांनी केले.
हे देखील वाचा:
Comments are closed.