राजकीय हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब

वेळेवर कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाचे काम खोळंबळे, तहसीलदारांकडे तक्रार

1

सुशील ओझा, झरी: येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतून विहित वेळेत कर्ज वाटप व्हावे याकरिता तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. तालुक्यातील महादापूर, टेम्बी, चालबर्डी व मूधाटी या गावातील अनेक आदिवादी समाजाच्या शेतकऱ्यांना तालुक्यातील काही राजकीय पुढारी यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

काही राजकीय पुढारी हे महाराष्ट्र बँकेत येऊन शाखा व्यवस्थापक यांना तुम्ही वेळेवर कर्ज देत नाही असे बोलून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्या कामात अडथळा निर्माण करीत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप होत नसल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे. शाखा व्यवस्थापक दरवर्षी वेळेवर पीककर्ज देतात पण यावर्षी राजकीय हस्तक्षेपामुळे पीककर्जास विलंब होत आहे. त्यामुळे शेतीचे कामे खोळंबली असल्याचा आरोपी तक्रारीतून करण्यात आला आहे.

पीककर्जाचा आधार घेऊन जे राजकीय पुढारी आपली पोळी शेकत आहे अशांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कान्हू टेकाम, संबुदेव मेश्राम, श्यामराव टेकाम, संजय उरवते, विनोद उरवते, विनोद अरके, लक्षण टेकाम, दादाजी आत्राम, भीमराव टेकाम व घागरू आत्राम यांनी केली आहे.

हे देखील वाचा:

प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक व विक्री प्रकरणी आज आणखी दोघांना अटक

ग्रामपंचायत सदस्य असलेली आशा स्वयंसेविका पदावरून कार्यमुक्त

Leave A Reply

Your email address will not be published.