टाकळी-दाभा दरम्यान ट्रकचा अपघात, पुलाच्या कठड्यात अडकला क्लिनर

चेकपोस्ट चुकवण्याच्या नादात अपघात, एक तासांच्या परिश्रमानंतर क्लिनर सुखरुप बाहेर

0

पाटण प्रतिनिधी: तामिळनाडूतून कलर पेन्टसाठी लागणारे केमिकल घेऊन नागपूरकडे निघालेल्या ट्रकचा राज्य महामार्गावरील टाकळी व दाभा गावादरम्यान भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दोन जण जखमी झालेत. राष्ट्रीय महामार्गावरून येत असताना गाडी ओव्हरलोड असल्याने त्यांनी शॉर्टकट घेतला. मात्र खराब रस्त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी व हा अपघात झाला.

तामिळनाडू येथील मदुराई येथून ट्रक (AP04 TT6215) कलर पेन्टचे केमिकल घेऊन नागपूरला जात होता. या ट्रकमध्ये चालक व ट्रॉलीमध्ये दोन क्लिनर बसून होते. आंध्र व महाराष्ट्र बॉर्डरवर चेकपोस्ट आहे. ट्रक ओव्हरलोड असल्याने दंड बसण्याच्या भीतीने चालकाने राष्ट्रीय महामार्गावरून शॉर्टकट घेत चेक पोस्ट चुकवण्यासाठी पाटण-बोरी मार्गाने शॉर्टकट घेतला.

सध्या टाकळी गावाजवळ पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता खराब अवस्थेत आहे. रात्री 9 वाजताच्या सुमारास या ठिकाणी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक बांधकाम सुरु असलेल्या कठड्याला आदळली. अपघातामुळे गाडीचा अर्धा भाग खाली तर अर्धा भाग कठड्याला लटकून होता. या कठड्यामध्ये एका क्लिनरचा पाय अटकला.

बचावकार्य करताना गावकरी व कर्मचारी

दरम्यान होमगार्ड राजू गुडेवार या रस्त्याने जात असताना त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी त्वरीत टाकळी व दाभा येथील गावक-यांना याची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळलाच गावकरी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी क्लिनरचा पाय कठड्यात अडकल्याचे आढळून आले. गजानन खडसे, जालंदर गोपेवर, राजू गुडेवार, दशरथ बुरेवार, शेख जुनेद, अविनाश खडसे, शेख सलिम हे मदतकार्यासाठी सरसावले. त्यातील काही गाडीवर चढले व त्यांनी गाडीतील पोते विळ्याने कापून क्लिनर सुखरूप बाहेर काढले. सुमारे एक तास हे मदतकार्य चालले.

पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी पोहचले. त्यांनी शासकीय वाहनाने अपघातग्रस्त क्लिनरला पाटणबोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारास पांढरकवडा येथे रेफर करण्यात आले, गाडीमालकास बोलावून याबाबत पूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी पीएसआय मोरे, होमगाई शेख इरफान, नंदू कुंतलवार, राजू गुडेवार, दशरत बुर्रेवार, जालंदर गोपेवार उपचार होईपर्यंत दवाखान्यात उपस्थित होते.

हे देखील वाचा:

राजकीय हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

Leave A Reply

Your email address will not be published.