स्थानिकांच्या रोजगारासाठी वंचित आक्रमक, उपोषणाचा इशारा

कंपनीत स्थानिकांना रोजगार देण्याची वंचितची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: वेकोलिने अनेक कामे खासगी कंपनीला आउटसोर्स केले आहे. या कंपनी स्थानिकांना डावलून परप्रातीयांना रोजगार देत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने याबाबत निवेदन सादर केले. जर 15 दिवसांमध्ये स्थानिकांना रोजगार दिला नाही तर उपोषण केले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

बोरगाव (अहेरी) येथील जुनाड वेकोलिने हिल टॉप या खासगी कंपनीला कंपनीला काम आऊटसोर्स केले आहे. या कंपनीद्वारा स्थानिक बेरोजगारांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देण्याची तयारी कंपनीने केली आहे. त्यामुळे वंचितने स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा उचलला आहे. शिवाय परिसरात असलेल्या इतर कारखाने व कंपनीमध्येही स्थानिकांनाच रोजगारासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणी वंचित आघाडीने केली आहे.

कोरोनाच्या काळात सर्व रोजगार बंद पडले असून अनेक गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. तसेच वेकोलिने शेती संपादित केल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या अनेक नागरिकांचा रोजगार गेला आहे. वेकोली परिसतील संपादित क्षेत्रामधील गावांमध्ये हजारो बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे त्यांना 15 दिवसांमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वंचितने केली आहे.

बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मिलिंद पाटील, शहराध्यक्ष किशोर मुन, रघुनाथ कारेकर, विठ्ठल विरुटकर, रवींद्र मेश्राम, उमेश गोहोकार, अक्षय लोहकरे, गीत घोष यांच्यासह बोरगाव येथील बेरोजगार तरुण उपस्थित होते.

हे देखील वाचा:

काँग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.