वणीत शासकीय रक्तपेढी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांना लिहले युवकांनी स्वतःच्या रक्तानी पत्र
सुशील ओझा, झरी: कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अनेकांना रक्ताची चणचण भासत आहे. वणी परिसरात मोठ्या संख्येने सिकलसेलचे रुग्ण आहेत. परिसरातील रक्तदान शिबिरात शेकडो बॅग रक्त संकलन होऊन येथील रक्त अशासकीय रक्तपेढीला जाते. अशासकीय रक्तपेढीतुन रक्त खरेदी करणाकरिता हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे वणीत शासकीय रक्तपेढी व प्लाझ्मा सेंटर सुरू करावे, अशी मागणी झरी परिसरातील तरुणांनी व रक्तदान महादानच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी या तरुणांनी रक्ताने लिहिलेली पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहेत.
वणी मध्ये उपविभागातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे, येथे झरी जामनी, मारेगाव, वणी तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच थालिसीमिया/सिकलसेलचे रुग्ण ही परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. अशा रुग्णाला रक्तपेढी अभावी चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर येथे रेफर केले जाते. या गडबडीत बऱ्याच रुग्णांना जीवही गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय त्यांना आर्थिक फटकाही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो.
रक्तदान महादान फाऊंडेशनचे अध्यक्ष मंगेश पाचभाई व हिंदवी स्वराजचे अध्यक्ष त्रिलेश राहुलवर यांच्या माध्यमातून चाळीस युवकांनी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना व आरोग्य मंत्री यांना पत्र लिहून वणी येथे शासकीय रक्तपेटी व प्लाझ्मा सेंटर सुरू करण्याची मागणी केली.
रोशन शिरपूरकर, जुगल शिरपुरकर, भवन माणुसमारे, हरीश टोंगे, सुदामा लोडे, संदीप उगे, गजानन उगे, विशाल बदकल, शुभम मत्ते, गणेश पेटकर, राहुल ठाकूर, अविनाश चंदनकर, प्रणल गोंडे, काशीनाथ काटकर, दत्ता लालसरे, संतोष पारखी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.