वणीतील जत्रा मैदानावरील अतिक्रमण काढण्याची मागणी
नगरसेवक पी.के. टोंगे यांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार
जब्बार चीनी, वणी: वणी नगर परिषदेच्या जत्रा मैदानावरील अतिक्रमण त्वरित काढावे व आयडीएसएमटी योजनेतील साईट सर्व्हीसेसच्या जागेवर असलेल्या अनाधिकृत रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक पी.के. टोंगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
नगर परिषदेला शासनाने जत्रा मैदान येथे आठवडी बाजार व बैलबाजारासाठी 12 जुलै 1933 ला वणी शिट नं. 20 डी, प्लॉट नं.21,78 व 105 असे एकूण क्षेत्रफळ 32 लाख 53 हजार 838 चौ. फुट जागा वार्षिक नझूल टॅक्सवर दिली आहे. सन 1991 मध्ये वणी नगर परिषदेला एकात्मिक शहर विकास योजना मंजूर झाली. तेव्हा शासनाने न.प.ला 37 एकर जागा दिली. त्यापैकी 5.86 हेक्टर जागा या योजनेत सेवा व सुविधे साठी दिली.
वणी नगर परिषदेमध्ये शासनाने न.प.ला २७५ ते २८० एकर जागा दिली आहे. शासनाच्या जागेवर ( नगर परिषदेला दिलेल्या ) विविध ठिकाणी आरक्षण आहेत. उदा. तलाव, शाळा, बगीचे, यात्रा, आठवडी बाजार, मटन मार्केट, प्ले ग्राऊंड इत्यादी. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 चे कलम 44 नुसार न. प. सदस्य तथा त्यावर विसंबून असलेल्यांनी शासकीय / न. प. च्या जागेवर अतिक्रमण केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची तरतूद आहे.
वणी नगर परिषदेच्या व शासकीय जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांनी तसेच पीके टोंगे यांनी वेळोवेळी तक्रार दिली आहे. 16 जुन 2015 ला जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी मुख्याधिका_यांना पत्र लिहून नियमानुसार कार्यवाही करुन अर्जदारास कळविण्याबाबत लिहिले. मात्र अद्याप अतिक्रमण न काढल्याने जत्रा मैदानातील १० एकर व जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या IDSMT योजनेतील Site & Services या जागेत 2 एकर जागेत अतिक्रमण झालेले आहे.
या जागेवर 40 हजार चौ . फुट जागेवर एक लग्न मंडप बांधून नागरीक धंदा करीत आहे. या जागेवर तट्टा बोरे, कोंबडी, मटन व मच्छीचे दुकाने आहे. लालगुडा स. नं. 3 व २ (वणी न. प. हद्दीत) च्या समोरील जागा २० मिटर पर्यंत अतिक्रमण केले आहे. वणी शहर विकास योजनेत ही जागा खुली असतांना नागरिकांनी स्वतः रस्ते टाकले आहे. या खुल्या जागेवर जीओ कंपनीने रस्ता नसतांना पोल टाकले आहे.
रविन्द्र निखार यांनी बांधलेले एच. पी. गॅस गोडाऊन जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या IDSMT योजनेतील साईट अॅन्ड सर्वीसेस जागेवर आहे. कारण सन 1991 मध्ये IDSMT योजना मंजूर झाली व दि. 18 जानेवारी 1997 ला उपविभागीय अधिकारी वणी यांनी या जागेची ताबा पावती दिली. यात्रा मैदान व साईट अॅन्ड सव्हींसेसच्या जागेवर अंदाजे 500 ते 700 मीटर रस्ता खडीकरण करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात अतिक्रमण करून रस्ता तयार करण्यात आला आहे.
याबाबत रविंद्र निखार यांनी दि. 3 ऑगस्ट 2020 च्या उत्तरात अतिक्रमण केले नाही असे उत्तर दिले. रस्त्याने व्यापलेली जागा अंदाजे 1.5 एकर असून सन 2012 -13 ला पत्र देऊन न.प. सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याबाबत कळविले परंतू अजूनपावेतो अध्यक्षांनी सभा काढलेली नाही.
नगर परिषदेच्या मालमत्तेची जपवणूक करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आहे. व न.प. चे नुकसान होवू नये हि काळजी नगर परिषद अध्यक्ष तथा सदस्यांची आहे. जर 4.5 कोटी रूपयाची न.प.ची मालमत्ता कोणी नागरिक स्वत:च्या फायद्यासाठी उपयोगात आणत असेल व सदस्य चूप राहत असेल तर निश्चितच सदस्यांना सुध्दा काही वाटा मिळत असावा संशय आहे. असा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
वेळीच दखल घेऊन चौकशी करून वणी न.प. हद्दीतील आरक्षणाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे व दोषीकडून आर्थिक नुकसान भरपाई वसूली करावी तथा दोषीवर फौजदारी कार्यवाही करावी. अशी मागणी पी के टोंगे यांनी केली आहे.