टाकळी येथील महिलांना गुरांच्या गोठ्याचा लाभ देण्यात यावा

महिलांची गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील असलेल्या टाकळी ग्रामपंचायतने २६ फेब्रुवारी राेजी शासनाच्या जीआर व नियमानुसार ग्रामसभा घेऊन पात्र महिलांना गुरांचा गोठा मिळण्याचा ठराव घेतला आहे. पतीचे निधन झालेल्या या महिलांना गुरांचे गोठे मिळावेत याकरिता गावातील या महिलांनी पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

नियमांप्रमाणेच हे गोठे द्यावेत अशी मागणी या निवेदनात आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाचे महिलांनी समर्थन केले. हे निवेदन कमला दुधबावणे, संगिता मंने, बेबी बुशेट्टीवार, लक्ष्मी टोंगलवार, रुकमा कापडे, नीता बोडेवार, शिंदू अंकतवार, लीलाबाई तुडमवार, शीला पेंदोर, लक्ष्मीकांता गोपेवार यांनी दिले आहे.

टाकळी गावातील पतीचा आधार गमावलेल्या प्रत्येक महिलेला गुरांच्या गोठ्यांचा लाभ मिळालाच पाहिजे. त्याकरिता मी व ग्रामपंचायत तत्पर आहे. कोणत्याही महिलांवर अन्याय होणार नाही व आम्ही स्वतः त्यांना लाभ मिळण्याकरिता झटणार आहोत.

-सरपंच संदीप बुरेवार

Leave A Reply

Your email address will not be published.