मुंगोली गावाला संवेदनशील गाव यादीत समाविष्ट करण्याची मागणी

मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कामाचा तहसीलदारांतर्फे आढावा

0

जितेंद्र कोठारी, वणी: पावसाळ्यात नदी-नाल्याना पूर येऊन नेहमी बाधीत होणाऱ्या संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांची तहसीलदार शाम धनमने यांनी बुधवार 9 जून रोजी पाहणी केली. यावेळी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कामाचा आढावाही त्यांनी घेतला. यावेळी मुंगोली गावातील नागरिकांनी मुंगोली गावाला अतिसंवेदनशील गावाच्या यादीत समाविष्ट करण्या करीत निवेदन दिले. नुकतेच संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली होती. यात मुंगोली गावाचा समावेश नाही.

Podar School 2025

वणी तालुक्यात पैनगंगा व वर्धानदी काठावरील जुगाद, शिवणी, चिंचोली व साखर गाव नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने अतिसंवेदनशील नोंद आहे. तर कळमना (बु.), देऊरवाडा, बोरी, कोलगाव, तेजापूर, नायगाव, टाकळी, चिखली, मूर्ती व अहेरी या गावाची संवेदनशील गाव म्हणून नोंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये वरील गावाना पुराचा धोका राहतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन आराखडा, पूर प्रतिबंधक उपाय योजना, शोध व बचाव पथक, शोध व बचाव साहित्य व उपकरणे, साथ रोग नियंत्रण आराखडा तसेच स्वयंसेवकाची यादी तयार करण्यात येते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मुंगोली गाव वर्धा नदीच्या काठावर तसेच वेकोली प्रकल्प बाधित असल्यामुळे या गावाला नवसंजीवनी योजनेत समाविष्ट करून अतिसंवेदनशील जाहीर करावे. अशी मागणीचे निवेदन मुंगोली गावातील नागरिक आयुष ठाकरे, ऍड. आशिष मळावी, रोहिदास ठाकरे, कार्तिक राजगडकर, संदीप सोयाम, रितीक आत्राम, राकेश केळझरकर यांनी तहसीलदार शाम धनमने यांना दिले.

हे देखील वाचा:

चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

“लॉकडाउन” काळात इंदिरा सूतगिरणीचे ‘लॉक” तोडून चोरी

Leave A Reply

Your email address will not be published.