‘या’ पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
आक्षेपार्ह टिप्पणीबाबत कार्यवाही करण्यासाठी निवेदन
विवेक तोटेवार, वणी: एका वृत्तवाहिणीच्या पत्रकाराने हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्याबद्दल आक्षेपार्य विधान केल्याने या वृत्तवाहिणीच्या पत्रकारावर त्वरित गुन्हा दाखल करावा व या वृत्तवाहिनीवर बंदी आणावी, अशाप्रकारचे निवेदन 17 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्री याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की न्यूज 18 चे पत्रकार आमिष देवगण यांनी हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती गरीब नवाज रहमतूल्लाह अलेह (अजमेर) यांच्याबाबत चॅनलवर एका डिबेट दरम्यान आक्षेपार्ह टीप्पणी केली. ख्वाजा गरीब नवाज हे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आहेत. विविध धर्मीय यांच्या दर्शनासाठी अजमेर येथे जातात. अशा महान संताबाबत आक्षेपार्ह शब्दाचा प्रयोग केल्याने सर्व धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
न्यूज 18 चे पत्रकार अमिश देवगण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. शिवाय या वृत्तवाहिणीवर बंदी आणण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी रज्जाक पठाण, नईम अजीज, अब्दुल कामील, शेख कासीम, शाहिद खान, समशेर खान, अय्युब खान, करीम खान, सैय्यद मोहसीन कादरी, जाहेद शरीफ, असिफ शेख, फारुख रंगरेज, परवेज खान पठाण, अब्दुल गणी, इकबाल समशेर खान उपस्थित होते.