माजी सरपंच दिलीप कावडे यांचे निधन 

शुक्रवारी सकाळी मेंढोली येथे होतील अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील रहिवासी दिलीप भानुदास कावडे (57) यांचे गुरुवार दिनांक 3 एप्रिलला सायंकाळी सहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते मेंढोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. परमडोह येथील ग्रामीण विद्यालयात ते लिपिक पदावर कार्यरत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. भाऊराव कावडे आणि वणीतील गणेश कृषी केंद्राचे संचालक वासुदेव कावडे यांचे ते लहान भाऊ होते. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11.00 वाजता मेंढोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments are closed.