गणपतराव आडपावार यांचे अल्पशा आजाराने निधन

अयोध्यानगरीतून निघेल आज 8 तारखेला रात्री 8.30 वाजता अंत्ययात्रा

विवेक तोटेवार, वणी: येथील ज्येष्ठ नागरिक गणपतराव आडपावार (75) यांचे आज बुधवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. पूर्वी ते रंगारीपुरा व आता नांदेपेरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळील लायन्स स्कूल नजिक अयोध्यानगर येथे राहत होते. काही दिवसांपासूनच त्यांचावर वणीत उपचार सुरू होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने अगदी दोन दिवसांपूर्वी त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेव्हा उपचारदरम्यानच त्यांचे निधन झाले. अंत्ययात्रा आजच रात्री 8.30 वाजता अयोध्या नगरी इथून निघेल. ते मनमिळावू व मितभाषी होते. धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रसर असायचे. शिवाय एक उत्तम गायक म्हणून त्यांची ओळख होती. धार्मिक असल्याने ते प्रत्येक वर्षी शेगाव येथे पायी वारीला जात. त्यांचे चिरंजीव शैलेशदेखील संगीत क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा शैलेश, उमेश, एक मुलगी, जावई व नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे. गपतरावांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.