उमा एकरे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन

अॅड. विनायक एकरे यांना पत्नीशोक, वणीत झालेत अंत्यसंस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक संत गाडगेबाब चौकाजवळील उमा विनायक एकरे (60) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ख्यातनाम विधिज्ञ तथा वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. विनायक एकरे यांच्या त्या पत्नी होत्या. उमा एकरे यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा हर्षल एकरे, अक्षय एकरे, मुलगी डॉ. शिल्पा गौरकार असा बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांच्यावर वणी येथील मोक्षधाम येथे दुपारी अंत्यसंस्कार झालेत. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.