कवडशी येथील मल्हारगड विकासाच्या वाटेवर

वर्धमान फाउंडेशनने दिली ६० हजारांची देणगी

0

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील कवडशी येथे मल्हारगड देवस्थान आहे. दरवर्षी येथे यात्रा भरते. चंदनाचे जंगल म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवडशी येथील मल्हारगड आता विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या मल्हारगड देवस्थानातील बाल उद्यान सजवायला वर्धमान फाउंडेशन वणी यांनी ६० हजाराची देणगी दिली आहे.

परिसरातील बहुतांश लोकांना कवडशी येथील चंदनाच्या जंगलाची माहितीच नाही. मोजक्याच लोकांना यासंबंधीची माहिती आहे. मल्हारगड येथे टेकडीवर प्राचीन हेमाडपंथी दत्ताचे मंदिर आहे, संपूर्ण परिसर हा वनराईने नटलेला आहे. दुर्मिळ अशी चंदनाची झाडे आहेत, सातवाहनकालीन इतिहासाशी साधर्म्य सांगणारी काही पुरातन अवशेष अभ्यासकांना मिळाली आहे. तसेच पायथ्याशी विस्तीर्ण असा तलाव आहे.

परिसरात प्राचीन दुमजली दगडी गुहा आहे. गावातील लोकांच्या व समितीच्या सहकार्याने शौचालय व इतर पायाभूत सुविधांची निर्मिती चालू आहे. प्रशासकीय गलथानपणामुळे ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचं घोंगड भिजत आहे. गावातील वातावरण हे अत्यंत सौहार्दाचे व शांत आहे. गावाची लोकसंख्या 550 असून सर्व जातीसमुहाचे लोक आनंदाने जीवन जगत आहे.

(हे पण वाचा: मारेगावातील अंगणवाडी झुडुपांच्या विळख्यात)

गावालगतच निर्गुडा नदी वाहते. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे, वनविभागाने परीसरात एक रोपवाटीका निर्माण करून ग्रामस्थांना रोजगाराची संधी मिळवून दिली आहे. सुरेश चोपणे यांनी सुद्धा प्राचीन अवशेषाच्या आधारे या परिसराचा अभ्यास केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.