सुशील ओझा, झरी: हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवून आपल्या असंख्य अनुयायांना सोबत घेऊन 14 ऑक्टोबर 1956 म्हणजेच अशोक विजयादशमीला नागपूर मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.
देशात ठिकठिकाणी विजयादशमी ला विविध कार्यक्रम होत असतात, मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुकुटबनमध्ये आंबेडकर भवन परिसरात अगदी साधेपणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत “धम्मचक्र प्रवर्तन दिन” साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात यावेळी त्रिषरण, पंचशील बुद्धवंदनेसह बाबासाहेबांच्या आणि गौत्तम बुद्धांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले, यावेळी बौद्ध बांधव उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)