धामणी अत्याचार प्रकरणी भाजपाचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले नेतृत्त्व

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथील पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आरोपी नराधमास फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने आज शनिवारी मारेगाव पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्त्व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.

महिलांवरील अत्याचाराच्या घटना सतत घडत असताना सरकार मात्र गांभीर्याने घेताना दिसत नाही. राज्यातील महिला असुरक्षित आहे या पुढे महिलांनी सावध असले पाहिजे सरकारला येत्या आधिवेशनात जाब विचारणार असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. असे वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, तालुक्यातील धामणी या गावातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार ही निंदनीय प्रकार आहे. या घटनेचा जाहीर निषेध करतो. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी ते शासनाकडे लावून धरणार आहेत.

या निषेध मोर्चात शेकडो महिलांसह पुरुष सहभागी झाले होते. मोर्चा स्थानिक नगरपंचायत परिसरातून निघून मारेगाव पोलीस स्टेशनवर धडकला. यावेळी अत्याचार करणाऱ्या नराधम बंडू भडकेस फाशीची शिक्षेची मागणी करणारे निवेदन मारेगावचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेर्तृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया शेरे, जिल्हा सचिव शंकर लालसरे, प्रा.डॉ.माणिक ठिकरे, वणी पं. स.चे सभापती संजय पिंपळशेडे ,रवी बेलूकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शहर अध्यक्ष विलास चिंचोलकर, नगरसेवक प्रशांत नांदे, सविता दरेकर, शोभा नक्षणे, सुनिता पांढरे, शारदा पांडे यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.