रविवारी वणीत भव्य रोग निदान शिबिर

गोहोकार यांच्या नेत्रोदय हॉस्पिटल येथे आयोजन

जब्बार चीनी, वणी: रविवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी वणीतील डॉ. गोहोकार यांच्या नेत्रोदय डोळ्यांच्या हॉस्पिटल येथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळ पासून दिवसभर हे शिबिर चालणार आहे. या शिबिरात बीपी व शुगर असणा-या रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे तर सामान्य रुग्णांसाठी 50 रुपये फीस आकारली जाणार आहे. तपासणीमध्ये ऑपरेशनची गरज भासल्यास व त्या दिवशी नोंदणी केल्यास रुग्णांना 30 टक्के पर्यंतची सूट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ.गोहोकार नेत्रोदय डोळ्यांचे हॉस्पिटल येथे संपर्क साधावा असे आवाहन नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार (MBBS, DOMS) यांनी केले आहे. पत्ता : गंगशेट्टीवार मंगल कार्यालय जवळ, वरोरा रोड वणी 

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!