सावधान… ! दुचाकी चालकांविरुद्ध वणी पोलिसांची मोहीम

● शहरातील विविध रस्त्यावरुन 16 दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा

जितेंद्र कोठारी, वणी: भरधाव वेगाने धूम स्टायल दुचाकी चालवुन चिडीमारी करणाऱ्या टवाळखोर मुलांविरुद्द धडक कारवाईची मोहीम वणी पोलिसांनी हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अकारण उभे राहणारे तसेच सुसाट वेगाने बाईक चालविणाऱ्या 16 दुचाकीस्वाराना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. ठाणेदार शाम सोनटक्के यांचे नेतृत्वात शहरातील विविध मार्गावरील शाळा कॉलेज परिसरात गुरुवार 2 नोव्हेंबर पासून या मोहीमची सुरवात करण्यात आली.

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शहरातील सर्व शाळा कॉलेज बंद होते. मात्र आता शाळा,कॉलेज व कोचिंग क्लासेस सुरु होताच विचित्र केशभूषा असलेले टवाळखोर मुलांकडून चिडीमारी व छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. टवाळखोर युवक शाळा, महाविद्यालय भरताना व सुटण्याच्या दरम्यान परिसरात उभे राहून मुलींची छेड काढीत असतात.

शहरातील वरोरा रोड व नांदेपेरा रोड भागात धूम स्टाइल वाहने चालविणाऱ्या टवाळखोरांचा त्रास वाढला आहे. विशेष म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या तरुणीं व फिरायला जाणाऱ्या महिलांना टवाळखोरांचा नाहक त्रास सहन करावा लागत असे.

शाळकरी मुलीं व महिलांची छेड रोखण्यासाठी दामिनी पथक तयार करण्यात आले आहे. मात्र वणी पोलीस ठाण्यात केवळ एक महिला पोलीस अधिकारी असल्यामुळे दामिनी पथक कुचकामी ठरत आहे.

हे देखील वाचा:

मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…

Comments are closed.