दिग्रस पुल बनले तस्करीचे प्रमुख केंद्र

पंचायत समितीच्या हाकेच्या अंतरावर मटका सुरू

0

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत शिबला, माथार्जुन, झरी व पाटण मध्ये मटका, अवैध प्रवासी वाहतुक, देशी दारुची विक्री जोरात सुरु आहे. तेलंगाणाला जोडनारा दिग्रस-अनंतपुर पुल तस्करांचे प्रमुख केन्द्र बनले आहे. ह्या पुलावरून दारु, गुटखा आणि गोवंश तस्करी खुल्लेआम सुरु आहे.

झरी येथे पंचायत समिती च्या हाकेच्या अंतरावर बस स्टॅंड चौकात राजरोसपणे दोन मटका काउंटर सुरु आहे. पाटण, माथार्जुन आणि शिबला येथे सुध्दा तीन मटका काउंटर सुरु आहे. अवैधदारु, अवैध प्रवासी वाहतुक राजरोसपणे सुरु आहे. हे धंदे सुरु ठेवण्यासाठी राजकीय व व्यापार्यांचे शिष्टमंडळ ठाण्यात आले होते. त्यामुळे ह्या धंदेवाईकाना मुक सहमत्ती देण्यात आली असे ठाणेदार यांचे म्हणणे आहे. ह्यावरुन धंदेवाइकाना सर्रासपणे राजकीय व पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचे दिसत आहे.

वणी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे डी. बी. पथकही कुचकामी झाले आहे. पंधरा दिवसापुर्वी सुर्दापुर येथील बंद जिनींग मधे चार दिवसापासून हायप्रोफाईल जुगार सुरु होता याची कल्पना वणी उपविभागिय पोलिस अधिकारी लगारे यांना व पाटणचे ठाणेदार लश्करे यांना होती. त्यांना मोबाईलवरुन गुप्त माहिती सुध्दा मिळाली होती तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही. शेवटी पोलीस अधीक्षक ह्यांना मोबाईलद्वारे गुप्त माहिती देण्यात आली. यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरकवडा उपविभागिय पोलिस अधिकारी कोळी व पोलिस निरीक्षक असलम खान यांनी कारवाई करुन ५६ लाखाचा मुद्देमाल जब्त करुन २३ लोकाना अटक केली हे उल्लेखनीय आहे.

पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावात अवैध दारू विक्रेते भल्या पहाटे पासुनच राजरोसपणे दारू विक्री करताना दिसून येत आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही. तेलंगाणाला जोडनार्या दिग्रस पुलावरुन गोवंश, गुटखा, दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. रात्रीच्या वेळेला अतीसंवेदनशील जागेवर आपल्या मर्जीतील महिला कर्मचाऱ्यांना चेक पोस्टवर ड्युटी लावण्यात येते. पोलीस ठाण्यातील सीडीआर रेकार्ड जर तपासून पहिला तर ह्या प्रकरणातील महिलांच्या ड्युटीचे खरे वास्तव उघडकीस येईल. या मार्गावरून रात्रीच्या वेळेला तस्करी होत असताना सवेंदनशील जागी महिला कर्मचा-यांची ड्युटी का लावण्यात येत आहे, हा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे ठाणेदारांच्या एकूणच कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.