डॉ दिलीप अलोणे सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी लाईव्ह

शेती आणि लोककला या विषयांवर होईल चर्चा

0

बहुगुणी डेस्क, वणी: येथील प्रगतशील शेतकरी तथा लोककलावंत प्रा डॉ दिलीप अलोणे यांची शेती व लोककला या विषयावर दि 27 सप्टेंबर ला सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून मुलाखतिचे थेट प्रक्षेपण होणार आहे. प्रा. दिलीप अलोणे हे येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नुकतेच ते निवृत्त झाले आहे.

शिक्षकी पेशासोबतच नकलाकार व प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. नकला या लोककलेचा प्रसार केल्याने त्यांना शासनाने सन 2011 मध्ये सांस्कृतिक कार्य पुरस्कार देऊन गौरव केला.तसेच अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई शाखेने या वर्षी नुकताच सर्वोत्कृष्ट एकपात्री कलावंत म्हणून सन्मानित केले. डॉ. अलोणे हे एक प्रगतशील शेतकरी असून ते शेतात पिकांचे नवनवीन प्रयोग करून भरगोस उत्पादन घेतात.

याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने सन 2007 मध्ये शेतिमित्र म्हणून गौरविले. सह्याद्री वाहिनीवर शेती व लोककला या विषयावर कार्यक्रम अधिकारी डॉ आलोक खोब्रागडे हे डॉ. अलोणे यांची मुलाखत घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.