बहुगुणी डेस्क, वणी: वणीमध्ये 25 मार्च 2019 ते 31 मार्च 2019 दरम्यान अपंग सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अपंगांना विविध उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, नांदेपेरा रोड हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. शिबिरात कृत्रिम पाय, कृत्रिम सांधे (कॅलिपर्स) कुबड्या, कर्णयंत्र यासोबतच तीन चाकी सायकल, व्हिल चेअर इत्यादीं उपकरणाचं वाटप केलं जाणार आहे. हे शिबिर भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई तसेच स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, रोटरी क्लब, राजुरी स्टिल, लोढा हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून होत आहे.
वणी आणि परिसरात अनेक अपंग व्यक्ती आहेत. अनेकदा गरीबीमुळे अपंगांना उपकरण घेणं झेपत नाही त्यामुळे अशा व्यक्तींना केवळ उपकरणा अभावी अपंगत्व सोबत घेऊन फिरावं लागतं. अशा लोकांना मदत व्हावी या उद्देशाने अपंग सहायता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे गरजूंना कुबड्या, कर्णयंत्र, कृत्रिम सांधे, कृत्रिम पाय तसेच पायाने अधु असणा-यांना तीन चाकी सायकल, व्हिल चेअर मोफत दिली जाणार आहे.
या शिबिरात अपंगांसाठी देण्यात येणारे साहित्य मोफत दिले जाणार असले तरी कार्यक्रमाच्या आधी लाभार्थींची नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच कार्यक्रमस्थळी येताना पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, ओळखपत्राची फोटो कॉपी (झेरॉक्स) आणणे गरजेचे आहे.
नोंदणीसाठी अतुल अंबारे – 8308823977, हर्षा व-हाडे – 8308823985, प्रवीण झाडे – 9765570456, उत्तरवार मोटर्स – 9822029203, अंकुश जयस्वाल – 9423131524, विनोद खुराणा – 9822361333, ऍड नीलेश चौधरी – 9823277096, राकेश खुराणा – 9922161616 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिसरात जे कुणी गरजू अपंग आहे अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना या शिबिराचा लाभ घेण्यास मदत करावी असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.