लोटी महाविद्यालयातर्फे गरजुंना कपडे व वस्तूंचे वाटप

राज्यशास्त्र विभागाचा स्तुत्य उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयातच्या राज्यशास्त्र विभागातर्फे रविवारी गरजुंना कपडे व वस्तूंचे वाटप करण्यात आले. अगोदरही 1 मे रोजी राज्यशास्त्र विभागाद्वारे कपडे व वस्तूचे गरजूंना वाटप करण्यात आले होते.

संत गाडगे बाबांच्या शिकवणीनुसार जमेल त्या मार्गाने गोरगरिबांची मदत करण्याच्या दृष्टीने लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाद्वारे ‘बंध माणुसकीचे नाते आपुलकीचे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून 340 कपडे व काही वस्तू संकलित करण्यात आल्या. संकलित कपडे व वस्तूंचे 1 मे 2022 ला महाविद्यालयाच्या परिसरात गराजवंतांना वाटप करण्यात आले होते.

या उपक्रमाला गराजवंतांचा भरपूर प्रतिसाद मिळाला या उपक्रमामध्ये सातत्य ठेवण्यासाठी 25 मे ते 30 मे पर्यंत शहरातील गणमान्य नागरिकांनी आपल्याकडे सुस्थितीत असलेले 210 कपडे व इतर वस्तू राज्यशास्त्र विभागाकडे जमा केलेत. 5 जून 2022 ला महाविद्यालयाच्या परिसरात प्रा. डॉ. विकास जुनगरी, प्रा गणेश माघाडे तसेच विद्यार्थ्यांच्या चमूद्वारे संकलित कपड्यांचे व वस्तूंचे वाटप करण्यात आले. प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हे देखील वाचा:

महिलेचा 9 महिन्याच्या बाळासह आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध

Comments are closed.