राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पोलीस ठाण्यात फेसशिल्डचे वाटप

0 625

जब्बार चीनी, वणी: कोरोनाला रोखण्यासाठी सध्या पोलीस विभाग जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. सध्या वणीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने पोलिसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पोलिसांना फेसशिल्ड याचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

वणीत कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या परिस्थितीतही पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकारी वणीकरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करून कर्तव्य बजावत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी वणीतील पोलीस ठाण्यात फेसशिल्डचे वाटप करण्यात आले. हे फेसशिल्ड ठाणेदार वैभव जाधव यांना सुपुर्द करण्यात आले.

डॉ. महेंद्र लोढा यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमासाठी जयसिंग गोहोकर, सविता ठेपले, राजाभाऊ बिलोरिया, विजया आगबत्तलवार, वैशाली तावडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Loading...