सुशील ओझा, झरी: संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातला आहे.त्यामुळे संपूर्ण भारतात लोकडाऊन घोषीत असल्याने गरीब, कामगार, शेतमजूर यांची परिस्थीती अतंत्य हालाकची व बिकट आहे. याचं पार्श्वभूमीवर आपल्या झरी तालुक्यातील आदिवासी दुर्बल अशा वरपोड या गावी सामाजिक दाईत्व दाखवत आश्रम शाळा पाटण येथील सर्व कर्मचारी वृंदाच्या मदतीने गावातिल संपूर्ण 27 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आपल्या तालुक्यातीलच नव्हे तर जिल्हयातील मदत करनारी पहीली एकमेव आश्रम शाळा म्हनून नोंद करण्यात आली.खरोखरच कर्मचारी वृदांनी दाखवलेले दाईत्व, नक्कीच प्रेरनादायी आहे. पाटण आश्रम शाळेने उचलेले हे पाऊल तालूक्यातील इतरही शाळांनी,आणि युवकांनी एकत्र येवून अशा प्रकारची मदत करून सामाजीक दाईत्व निर्माण करावं.
खरे तर शिक्षक हा समाजाचा दुवा आहे,तो जर मनावर घेतले तर हे सर्व शक्य आहे. खरं या शाळेनी दाखविलेल्या मदतीची सर्व स्तरातून कौतूक होत आहे. तालूक्याचे तहसिलदार जोशी यांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केले. आणि याचं प्रमाणे इतरही शाळेने पुढाकार घेवून प्रशासनास मदत करावी, असे सुचविले.
या सामाजिक दाईत्वा बद्दल संस्थेच अध्यक्ष प्रवीण कासावार यांनीही कर्मचारी वृदांचे आणि केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतूक केले.
या सामाजिक बांधीलकी मध्ये शाळेचे माध्य मु.अ. सतिश दासपतवार,प्राथ मु.अ.अतुल गणोरकर,गजानन चंदावार, प्रमोद केलेगुंदी,
आतिश कडू, कु.शुभांगी लिहितकर, राहूल मानकर, राकेश परसावार, विशाल खोले,कु.निलम गेडाम,विक्रम मुत्यलवार,अजय भुत्तमवार,कु.मयुरी ठेंगणे,उमेश बलकी,महेश कासावार, कु. मोनिका बोनगिरवार,साै.वैशाली तोटेवार, गजानन गिज्जेवार,अशोक गोदुरवार,सचिन भादिकर,जमिर शेख,प्रशांत मुके,गजानन भिंगेवार,विलास मेश्राम, गजानन सांगपगवार आदिंनी या कार्यास अथक परिश्रम घेतले.