नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरेंची वणीला मदत

नाम फाऊंडेशनतर्फे गरुजूंना धान्याच्या किटचे वाटप

0

जब्बार चीनी, वणी: लॉक डाऊन च्या काळात सर्व उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे मजूर वर्गाची उपासमार होत आहे. रोजनदारी वर काम करणारे, ऑटो चालक, खाजगी वाहन चालवीणारे ड्रायवर, ग्रामीण भागातील कलाकार, घर काम करणारे, विधवा, परितक्त्या महिला, अंध, अपंग, बैण्ड पार्टिवाले, रेड लाईट परिसरातील महिला यांच्यावर उपासमारिची वेळ आली आहे. त्यांना किराणा किट देवून नाम फाउंडेशनने मदतिचा हात दिला आहे.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यां साठी सुरु केलेल्या नाम फाउंडेशन ने आज पर्यन्त अनेकांना मदतिचा हात दिलेला आहे. हीच भावना मनात ठेवून या कोरोणा मुळे आलेल्या संकटावर मात करण्या साठी वणी तालुक्यातील काही गावा मध्ये २५० गरजू व्यक्तीला किराणा मालाचे वाटप करुन मदतिचा हात दिलेला आहे.

ही मदत यवतमाळ जिल्ह्यातील वणी, नेर, पुसद, उमरखेड, झरी, यवतमाळ या तालुक्यात करण्यात येणार आहे. नाम चे विदर्भ, खानदेश प्रमुख हरीष इथापे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा समन्वयक नितिन पवार यांच्या पुढाकाराने ही मदत पोहचविन्यात येत आहे. तसेच
आज बहुतांश लोकांवर उपसमारीची वेळ आलेली आहे मात्र समाजातील काही मध्यम वर्गीय कुटुंबाला गरज असूनही कुणाला माघु शकत नाही अशा घटकांना विशेष करुण ही मदत देण्यात येणार आहे जसे हातावर पोट असलेले कलाकार, ऑटो चालवीणारे चालक, कंत्राटी कर्मचारी अशा वर्गांणा खास करुण ही मदत घरपोच पोहचविन्यात येणार आहे.

वणीतील 20 ऑटो चालकांसह , रेडलाईट एरियातिल गरजू महिलांना देखील किट वाटप करून येथून मदतिचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात गरजूंना ही मदत देण्यात आली. यावेळी तहसीलदार श्री धनमने साहेब, नाम चे जिल्हा समन्वयक नितीन पवार, वणी तालुका समन्वयक धीरज भोयर, कुणाल नागमोते , प्रशांत भोयर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.