सुशील ओझा, झरी: गोदावरी अर्बनच्या मुकुटबन शाखेतर्फे पाटण येथील शासकीय कोविड केंद्रावर असलेल्या कोविड रुग्णांना फळ-मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले, त्यांच्या आरोग्याचा विचार करून गोदावरी अर्बन शाखा मुकुटबन तर्फे रुग्णांना वरील वस्तू वाटप करण्यात आले.
त्यावेळी पाटण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार संगिता हेलोंडे व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते, गोदावरी अर्बन नेहमीच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न नेहमीच असतो अश्या शब्दात ठाणेदार संगिता हेलोंडे यांनी गोदावरी अर्बनच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी मुकुटबन शाखाधिकारी धम्मपाल निमसरकार व सहायक अधिकारी केतन ठाकरे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: