मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

बहुजन कल्याण विभाग मंत्रालयाचा उपक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: मुकूटबन येथील जय बजरंग शिक्षण संस्थेचे संस्थापक संचालक स्व. वसंतराव उदकवार यांच्या सातव्या पुण्यतिथी निमित्य मातोश्री पुनकाबाई आश्रमशाळेतील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना रविवार 19 डिसेंम्बर रोजी टॅबचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई तर्फे पुरवठा करण्यात आलेले तब्बल 350 टॅब मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनीना देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मानद सचिव गणेश उदकवार व प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य सुरेश परचाके, मुख्याध्यापिका कु.ममता जोगी, मुख्याध्यापक चंद्रशेखर वैद्य, प्राध्यापिका प्रविणा, श्रीहरी चेलपेलवार, विलास बरशेटटीवार, किसनराव काकरवार यांच्यासह आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.