ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात दिवाळीचा सण ‘कही खुषी, कही गम’ ह्या स्वरुपात होता. येथील व्यवसायिक प्रतिष्ठाणात आणि घरोघरी सकाळी सातच्या दरम्यान लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनानिमित्य मार्केट मध्ये कमालीची गर्दी झाली, तर दुसरीकडे येथील जिनिंग सुरु न झाल्याने शेतकरी वर्गाची दिवाळी चणचणीत गेली.
विविध समस्या, महागाई, शेतमालाला असलेला कमी भाव यामुळे यावर्षी दिवाळी सणाचा उत्साह काहीसा कमी असला तरी, या वेळी लक्ष्मीपूजनाचा बरोबर काही परिवर्तनवादी विचारांच्या लोकानी आपल्या घरी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून वैचारिक दिवाळी साजरी केली, यात मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अनामिक बोढे, ज्योतिबा पोटे तसंच काही परिवर्तनवादी लोकांच्या घरी जिजाऊ पूजनाने दिवाळी साजरी करन्यात आली, बाकी सर्वत्र लक्ष्मी पूजनाने पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली.
यावर्षी दिवाळीत फटाक्याची आतषबाजी सुध्दा कमी प्रमाणात ऐकायला आली. दिवाळीत बाजारात मंदी आणि शेतकऱ्याचा कृषी माल घरी पडलेला असून, कापूस खरेदी केन्द्र सुरु न झाल्याने दिवाळी सणाचा उत्साहावर पाणी फिरल्याचं दिसले.