विठ्ठलदास देवचंदमध्ये दिवाळीच्या सर्वात मोठ्या ऑफरला सुरूवात

प्रत्येक वस्तूंवर आकर्षक गिफ्ट, रोज मोबाईल जिंकण्याची संधी

सुरेश पाचभाई: वणीतील टागोर चौक येथील विठ्ठलदास देवचंद या प्रतिष्ठाणमध्ये दिवाळीच्या सर्वात मोठ्या ऑफरला धनोत्रयदशीपासून सुरूवात झाली आहे. दिवाळी निमित्त ग्राहकांना प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि होम अप्लायन्सेसच्या खरेदीवर एक आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे. तसेच ग्राहकांना खरेदीवर ऑनलाईन खरेदीसारखेच त्वरित 25 टक्के पर्यंतची कॅशबॅक ऑफरही मिळणार आहे. टीव्ही व फ्रिजच्या एक्सचेंजवर 5 हजार रुपयांपर्यंतची सूट व 14 वर्षांची वॉरंटी ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. तर एका भाग्यवान विजेत्याला मोबाईल जिंकण्याची संधीही मिळणार आहे.* विशेष म्हणजे विठ्ठलदास देवचंद हे वणीतील सर्वात मोठे शोरूम असून ते 50 पेक्षा अधिक ब्रँडचे अधिकृत विक्रेते आहे. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी, लॅपटॉप, व्हॅक्यूम क्लिनर इत्यादी वस्तूंच्या खरेदी आधी ग्राहकांना त्याचा डेमो देखील बघता येणार आहे. ग्राहकांनी एकदा प्रतिष्ठाणात अवश्य भेट देऊन या दिवाळीतील खरेदीवर सर्वात मोठी बचत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

विठ्ठलदास देवचंद हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, होम अप्लायन्सेस व फर्निचर्स विक्रीतील सर्वात विश्वासाचे नाव आहे. परिसरातील पहिले शोरूम तसेच 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांपासून हे नाव ग्राहकांच्या मनावर गारूड करून आहे. 50 पेक्षा अधिक कंपनीचे अधिकृत विक्रेते व तीन पिढ्यांचा इलेट्रॉनिक्स वस्तू विक्रींचा अनुभव आहे. आता पर्यंत 2 लाख पेक्षा अधिक ग्राहकांना त्यांनी सेवा दिली आहे. याच सेवेसाठी दिवाळीत विठ्ठलदास देवचंद प्रतिष्ठाण हे दर्जेदार वस्तू व तेही विविध ऑफर सह सज्ज झाले आहे.

फायनान्स व कॅशबॅक सुविधा उपलब्ध
अनेकदा वस्तू विकत घेण्याची इच्छा तसेच मुहुर्तही असतो. मात्र पैशाची जुळवाजुळव होत नाही. त्यामुळे विठ्ठलदास देवचंद येथे ग्राहकांना बजाज फायनान्सची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ईएमआयवर देखील वस्तू विकत घेता येणार आहे. जर आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर वस्तू विकत घेतली तर आपल्याला त्यावर 25 टक्के पर्यंतची कॅशबॅक सेवाही मिळणार आहे. सोबतच 1 ईएमआई फ्री मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांची चांगलीच बचत होणार आहे.

 खरेदीवर मोबाईल जिंकण्याची संधी
बजाज फायनान्स द्वारा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खऱेदीवर रोज एक ऍन्ड्रॉईड मोबाईल गिफ्ट दिला जातो. या योजनेचे पहिले विजेते हे विठ्ठलदास देवचंद येथील ग्राहक ठरले आहे. शहरातील आशिष चरडे असे या भाग्यवान विजेत्याचे नाव आहे. त्यांना सॅमसंग कंपनीचा ऍन्ड्रॉईड फोन बक्षिस म्हणून सुपुर्द करण्यात आला. त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी विठ्ठलदास देवचंद येऊन सोनी कंपनीची एलईडी टीव्ही तसेच आयएफबी कंपनीची वॉशिंग मशिन खरेदी केली होती.

भाग्यवान विजेत्यांना गिफ्ट सुपुर्द करताना

पहिले खात्री करा नंतरच वस्तू विकत घ्या
अनेकदा ग्राहकांना वस्तू तर विकत घ्यायची असते. मात्र वस्तूंमध्ये कोणते फंक्शन्स आहेत. ते काम कसे करतात. कुठल्या प्रॉडक्टमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलीये. इलेक्ट्रिकचा खर्च किती येतो. इत्यादी अनेक प्रश्नांचे उत्तर नसते. त्यामुळे ग्राहकांना खरेदीआधी डेमो सुविधा दिली जात आहे. केवळ वस्तूंचा संपूर्ण डेमोच नाही तर कुटुंबातील व्यक्ती, बजेट, जागा इत्यादी, फंक्शन इ. गोष्टी लक्षात घेऊन त्यांना योग्य ते प्रॉडक्टही सजेस्ट केले जाते.

ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉपसह फर्निचर देखील उपलब्ध
शोरुममध्ये ब्रँडेड कंपनीचे विविध लॅपटॉप आहे. यात ऍप्पल, डेल, एचपी, एसर, असूस, लिनिवो इत्यादी कंपनीचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. हे लॅपटॉप देखील आपल्यााला मासिक किस्त तसेच कॅशबॅक ऑफरसह विकत घेता येणार आहे. यासह आकर्षक फर्निचर्सची मोठी रेंजही दुकाना मध्ये उपलब्ध आहे.

अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करण्यातच ग्राहकांचा फायदा
वणीत विठ्ठलदास देवचंद हे सर्वाधिक ब्रँडचे अधिकृत विक्रेते आहेत. यात 50 पेक्षा ब्रँड्सचा समावेश आहेत. अधिकृत विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेतल्यास ग्राहकांना त्याचा अधिक फायदा मिळतो. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच वस्तू खरेदी कराव्यात. शिवाय विविध ऑफर, कॅशबॅक, ईएमआई इत्यादीसह या वस्तू उपलब्ध आहेत.
– संचालक, विठ्ठलदास देवचंद

विठ्ठलदास देवचंद हे शहरातील टागोर चौक येथील इलेट्रॉनिक्स व होम अप्लायन्सेसच्या खरेदीसाठी एक विश्वसनीय असे नाव आहे. शहरातील सर्वात जुने तसेच 100 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले प्रतिष्ठाण आहे. आज या कुटुंबाची तिसरी पिढी हे काम करीत आहे. शहरातील सर्वात मोठे शोरूम म्हणूनही विठ्ठलदास देवचंद या प्रतिष्ठानची ओळख आहे. 2 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना त्यांनी सेवा दिली आहे. खरेदीच्या आधी एकदा ग्राहकांनी फ्रि डेमोसाठी भेट द्यावी असे आवाहन विठ्ठलदास देवचंद (प्रशांत ट्रेडर्स) तर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क – 9822221524 9822278776  9822278747

Comments are closed.