जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आठ दिवसाचे लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याची बातम्या सोशल मीडिया व वर्तमान पत्रात सुरु आहे. मात्र वणी विभागात कोविड रुग्ण इतर विभागापेक्षा कमी असल्यामुळे वणी विभागात आठ दिवसाचे लॉकडाउन लावण्यात येऊ नये. अशी मागणीचे निवेदन शुक्रवारी वणी येथील विविध राजकीय पक्षांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठविले.
कोरोना व लॉकडाउनमुळे मागील वर्षभरापासून उद्योजक, व्यावसायिक व मजूरवर्ग आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सर्वसाधारण व्यक्तीचे जीवनमान परत रुळावर येत असताना कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. परन्तु वणी विभागात कोरोना रुग्ण संख्या इतर विभागापेक्षा सद्य कमी आहे. संपूर्ण जिल्हा लॉकडाउन केल्यास याचे गंभीर परिणाम मजुरवर्ग व इतर कामकाजावर होईल. त्यामुळे लॉकडाउन लावण्याचे निर्णय झाल्यास वणी विभागाला या निर्णयातून वगळावे. अशी मागणीचे निवेदन शुक्रवार 5 मार्च रोजी वणी येथील विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना पाठविले.
निवेदन देताना राजाभाऊ पाथ्रडकर, रवी बेलूरकर, रज्जाक पठाण, राजू तुराणकार, राजाभाऊ बिलोरिया, सिद्दीक रंगरेज, प्रमोद निकुरे, राकेश खुराणा, सुधीर साळी, अनिल अक्केवार, मनोहर नागदेव, दीपक छाजेड, मिलिंद पाटील, मंगल तेलंग, ऍड. विपलव तेलतुंबडे, राजुभाऊ गुंडावार, जाफर अली व प्रशांत भालेराव उपस्थित होते.
हे देखील वाचा: