कोरोना काळात वीज पुरवठा तोडू नका

जागृत पत्रकार संघाचे उर्जामंत्र्यांना निवेदन

0

विवेक तोटेवार, वणी: कोरोना काळात शेतकऱ्यांचा व सर्वसामान्य जनतेचा वीजपुरवठा तूर्तास खंडित करू नये अशी मागणी जागृत पत्रकार संघटनेद्वारा करण्यात आली आहे. आज दिनांक 15 मार्च रोजी याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

राज्यात कोरोणाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यात कोरोणाच्या रुग्णासंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपाययोजना म्हणून प्रशासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कोरोना काळात शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. हे सर्व प्रचंड आर्थिक संकटात आहे.

विधिमंडळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मार्च रोजी विधानसभेत घोषणा केली की कोरोना काळात शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा वीजपुरवठा खंडित करू नये. परंतु 10 मार्चला वीज पुरवठा खंडितवरील स्थगिती उठविण्यात आली. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता होरपळल्या जात आहे.

शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा वीजपुरवठा खंडित करू नये अशाप्रकारचे निवेदन सोमवार 15 मार्च रोजी ऊर्जामंत्री नितीन राऊत याना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जागृत पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राजू धावंजेवार, संदीप बेसरकर, मोहमद मुश्ताक, गणेश रांगणकर, पुरुषोत्तम नवघरे, प्रशांत चांदनखेडे उपस्थित होते.

सरकारने सर्वसामान्यांना सहकार्य करावे: संदीप बेसरकर
कोरोना काळात सर्वसामान्यांच्या पाठीशी प्रशासनाने राहावे ही अपेक्षा आहे. परंतु जनता आर्थिक संकटात सापडला असतांना सरकारने वीज पुरवठा खंडित करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो सर्वसामान्याच्या समजण्यापालिकडे आहे. या काळात राजकारण न करता समाजकारण करावे.
– संदीप बेसरकर, अध्यक्ष जागृत पत्रकार संघ वणी

हे देखील वाचा:

वणीत कोरोनाचा विस्फोट, आज 19 पॉजिटिव्ह

रोहींचा कळप आडवा आल्याने दुचाकींचा विचित्र अपघात

Leave A Reply

Your email address will not be published.