वणीत कोरोनाचा विस्फोट, आज 19 पॉजिटिव्ह

रिपोर्ट येण्यास दिरंगाईमुळे संशयीतांचा शहरात मुक्त संचार

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा विस्फोट दिसून आला. आज तालुक्यात कोरोनाचे तब्बल 19 रुग्ण आढळून आलेत. कालच्या रुग्णसंख्येपेक्षा ही संख्या 17 ने अधिक आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील 16 रुग्ण आहे. यात जैन स्थानकजवळ येथे 6, रंगारीपुरा व टागोर चौक येथे प्रत्येकी 2 तर तेली फैल, देशमुखवाडी, पंचवटी अपार्टमेंट, प्रगतीनगर, वसंत गंगा, शास्त्रीनगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात वणी लगतच्याच चिखलगाव येथे 2 तर वागदरा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. आजच्या रुग्ण विस्फोटामुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 57 झाले आहेत. दरम्यान आज कोरोनाच्या लसीकरणाचे अधिकाधिक सेंटर सुरू करा अशी मागणी भारतीय जनता व्यापारी आघाडीच्या वतीने करण्यात आली.

सोमवारी दिनांक 15 मार्च रोजी यवतमाळहून 198 रिपोर्ट प्राप्त झाले. यात 11 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय आज 114 संशयीतांची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात आली. यात 8 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 106 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 110 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप यवतमाळहून 339 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान आज 3 कोरोनामुक्त रुग्णांला सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 57 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 22 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 22 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 13 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे एकूण 1317 रुग्ण आढळून आलेत. यातील 1235 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 25 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

रिपोर्ट उशिरा आल्याने कोरोनाचा प्रसार?
ज्या संशयीतांचे आरटीपीसीआर टेस्टसाठी स्वॅब घेण्यात येत आहे. त्याचे यवतमाळहून रिपोर्ट येण्यास दिरंगाई होत आहे. दरम्यान संशयीतांचा शहरात तसेच इतरत्र मुक्त संचार सुरूच असतो. या काळात अशा संशयीतांकडून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे. संशयीतांना रिपोर्ट येत पर्यंत कॉरन्टाईन करणे व रिपोर्टबाबत होणा-या दिरंगाईकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच विना मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या कारवाई आणखी कठोर करणे गरजेचे आहे.

लसीकरणासाठी अधिकाधिक सेंटर सुरू करा: भाजप व्यापारी सेलची मागणी
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविडची प्रतिबंधक लस देणे सुरू आहे. परंतु तालुक्यात लसीकरण सेन्टर एकच असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. परिणामी सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राची संख्या वाढवावी अशी मागणी भाजपच्या व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. याबाबत आज एसडीओ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देते वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर व भाजपा वणी शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष लवलेश लाल, सरचिटणीस संदीप मदान, उपाध्यक्ष रवी रेभे, सुधीर साळी,अनिल आकेवार, सचिव नितीन बिहारी, गुलशन खुराणा, आशीष जैन, राजू तिवारी, राहुल लाल, हितेन अटारा, अमोल वैद्य, लक्ष्मीनारायण लोया, दीपक जैन, रवी फेरवानी, होमेश पांडे, अनुप राठी, संतोष भेले, अवि दोडके, सुनील मत्ते, उज्ज्वल पांडे, कल्पेश पटेल, यश जोबनपुत्रा यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा:

रोहींचा कळप आडवा आल्याने दुचाकींचा विचित्र अपघात

बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकुळ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.