खट्याळ कॉमेडीने नटलेला ‘डॉक्टर जी’ चित्रपट शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये रिलीज

बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर बुकिंग उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: खट्याळ कॉमेडीने नटलेला बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि रकुलप्रीत सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी ही सिनेमा वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज होत आहे. त्यासाठी ऍडव्हांस बुकिंग सुरू झाली आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे.

चित्रपटात आयुष्मान खुराना एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे जो स्त्रीरोग विभागातील एकमेव पुरुष डॉक्टर आहे. चित्रपटाचा विषय खूपच बोल्ड आहे आयुष्मान खुरानाचा जंगली पिक्चर्ससोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्याने जंगली पिक्चर्ससोबत ‘बधाई हो’ आणि ‘बरेली की बर्फी’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.