तोतडी बोलते म्हणून सासरच्या मंडळीचा पत्नीला त्रास

शारीरिक मानसिक त्रास दिल्याने गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: मुळची राजूर येथील व विवाह करून राळेगाव येथे राहणाऱ्या महिलेने पतीच्या व सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून वणी पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार पती, भासरा, सासू, सासरे व नंदेवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, विवाहिता ही राजूर कॉलरी येथील रहिवाशी आहे. 2016 मध्ये तिचा विवाह राळेगाव येथील कुणाल देवीचंद भगत यांच्यासोबत रितिरिवाजानुसार झाला. 5 वर्ष झाल्यानंतरही अपत्य होत नाही. तोतडी बोलते व पीडितेला नोकरीवर लावून देण्यासाठी माहेरून पैसे आणण्याकरिता पती व सासरच्या मंडळींकडून नेहमीच त्रास दिल्या जात होता. सोबतच शारीरिक त्रास दिला जात असल्याने पीडितेने वणी पोलिसात तक्रार दिली.

प्रकरण पोलिसांपुढे आल्यानंतर त्यांचा समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना महिला आयोग पांढरकवडा येथेही पाठविण्यात आले. परंतु काहीही फायदा झाला नाही. शेवटी शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी पती कुणाल देवीचंद भगत (34), सासरे देवीचंद भगत, सासू महानंदा भगत, भासरा पवन देवीचंद भगत, नणंद संगीता कवडू गावंडे यांच्यावर कलम 498 (अ), 504, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.