मॅकरून स्टुडन्ट्स अकादमीत बालदिन उत्साहात

● विद्यार्थ्यांना भेटवस्तू व खाऊचे वाटप... विद्यार्थ्यांनी कायम बुद्धीप्रामाण्य असावे: शोभना

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील मॅकरून स्टुडन्ट्स अकाडमीत (सीबीएसई) बालदिन उत्साहात साजरा करणात आला. यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच खाऊचे वाटपही करणात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना या होत्या. तर प्रमुख पाहुणे हे मॅकरून आयटीआयचे प्राचार्य दामले हे होते. यावेळी शोभना यांनी विद्यार्थ्यांनी कायम बुद्धीप्रामाण्य राहावे असे प्रतिपादन केले.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शहरातील वडगाव रोडवरील मॅकरून शाळेतही हा दिवस उत्साहात साजरा करणात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दामले यांनी मनोगत व्यक्त करताना पं नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच त्यांनी मुलांच्या उज्ज्वल भविषासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका शोभना यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

विद्यार्थ्यांनी कायम बुद्धीप्रामाण्य असावे: शोभना
आजचे चिमुकले हे भारताचे उद्याचे भविष्य आहे. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती या महत्त्वाच्या गोष्टी असून आज जर त्यांची योग्य प्रकारे जडणघडण झाली तर देश आणखी प्रगतीपथावर जाईल. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व केवळ परिश्रमातूनच नाही तर बुद्धीप्रामाण्य आचरणातून फुलते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायम बुद्धी व मनाचा मेळ साधूनच निर्णय घ्यावा.
– शोभना, मुख्याध्यापिका (मॅकरून अकादमी) 

यावेळी इतर शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा सूत्रावे यांनी केले तर कुरील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल घाटे, शामली चौधरी यांचासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.