पुरुषोत्तम नवघरे, वणी:आज शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजता शेतकरी मंदिर लॉन येथे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर राहणार आहे. दिल्ली येथील कवि आणि लेखक राहुल नागपाल हे याची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अमरावती येथील डॉ. प्रदीप दंदे हे आंबेडकरी राजकीय चळवळीवर आपले विचार मांडणार आहेत. तर नागपूर येथील भूपेंद्र गणवीर हे लोककल्याणकारी राज्य या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. दिल्लीतील कवयित्री वंदना सिद्धार्थ या आपल्या कविता सादर करणार आहेत. सदर कार्यक्रम हा माता रमाई जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवंच, वणी तर्फे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.