रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट
मूत्ररोग, किडणीचे आजार, सायनस, शरीरावरील गाठी इ. रुग्णांची तपासणी,
बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिध्द सर्जन व मूळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांची आज वणीत व्हिझित राहणार आहे. वणी, मारेगाव, झरी तालुक्यात अडवान्स लेसर पाईल्स शस्त्रक्रिया आणि लेपरोस्कॉपिक शस्त्रक्रिया, हरणीया, हायड्रोसील, आतड्यांचे आजार, अन्ननलिकेच्या आजार, लठ्ठपणा कमी करण्याचे ऑपरेशन, डायबेटिक फूट, ट्रॉमा शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाचे ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे गर्भपिशविचे ऑपरेशन, कॅन्सरच्या गाठींचे ऑपरेशन, ब्रेस्ट कॅन्सर, थायरॉईड ऑपरेशन, व्हेरिकोज व्हेन्स चे ऑपरेशन, स्टेपलर सर्कमसिषन इत्यादी आजार व विकारांवर जाधव सर्जिकल क्लिनिकमध्ये उपचार होतात. नांदेपेरा रोडवरील समर्थ मेडिकल येथील जाधव सर्जिकल क्लीनिकमध्ये रविवारी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:०० या वेळेत रुग्णांवर उपचार होणार आहे.
अत्याधुनिक शस्त्रक्रिया आता वणीतच
जाधव सर्जिकल क्लिनिक येथे लेझरद्वारा विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. दुर्बिनद्वारा विना टाक्यांची शस्त्रक्रिया तसेच मूत्ररोग चिकित्सा आणि त्यावरचे उपचारही केला जातो. मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायलड सायनस, शरीरावरील विविध गाठी, कुरुप, मस्सा, चामखिळ इत्यादी शस्त्रक्रिया या क्लिनिकमध्ये होतात.
दूर्बिनीद्वारा विना टाक्याची शस्त्रक्रिया
अपेंडिक्स, पित्ताशयाची या दुर्बिनीद्वारा विनाटाक्याच्या शस्त्रक्रिया रुग्णांना करता येणार आहे. यासह मुतखड्यांचे आजार, किडनीचे आजार, मुत्राशय, मुत्रनलिका, प्रोटेस्ट्र ग्रंथी इत्यादी मुत्ररोगाचे आजार यावरील निदान आणि उपचार देखील रुग्णांना करता येणार आहे.
सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे मुळचे वणीतील ढुमे नगर येथील रहिवाशी असून त्यांनी शालेय शिक्षण वणीतच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी GMC नागपूर येथून आपले MBBS व MS चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना दिल्लीतील सुप्रसिद्ध FMAS (FELLOWSHIP IN Minimal Access Surgery) ही फेलोशिप मिळाली आहे. शिवाय त्यांना Coloproctology या विषयातील ISCP International Society of Coloproctology द्वारा फेलोशिप मिळालेली आहे.
विशेष म्हणजे देशातच नव्हे तर जगभरात लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. राज गझभिये यांच्या मार्गदर्शनात डॉ. आशुतोष जाधव यांनी प्रशिक्षण घेतले आहे. डॉ. जाधव सप्टेंबर 2022 पासून दर रविवारी वणीतील जाधव सर्जिकल क्लिनिक येथे रुग्णसेवा सुरू झाली आहे. परिसरातील रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता: जाधव सर्जिकल क्लिनिक, नांदेपेरा रोड, वणी
पूर्व नोंदणी साठी संपर्क: 9511860868, 9730106428
किंवा: समर्थ मेडिकल, नांदेपेरा रोड, वणी येथे संपर्क साधावा.
Comments are closed.