बौद्ध धम्मपरिषेदच्या आयोजकांनी व्यक्त केली डॉ. महेंद्र लोढांप्रती कृतज्ञता
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः 61 व्या धम्मदीक्षा सोहळादिनानिमित्त राजूर येथे नुकतीच धम्मपरिषद झाली. या धम्मपरिषदेच्या आयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी आयोजन व सर्वोतोपरी सहकार्य करणारे करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. लोढा या परिषदेचे स्वागताध्यक्ष होते.
राजूर येथे एवढ्या मोठ्या प्रमाणात धम्मपरिषदेचे आयोजन झाले. आयोजनापूर्वी पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ. लोढा यांना भेटायला गेलेत. त्यांनी या परिषदेचे महत्त्व व भूमिका डॉ. लोढा यांच्यासमोर मांडली. डॉ. लोढा यांनी लगेच या मोठ्या उपक्रमास होकार कळविला. कार्यकर्ते व पदाधिकारी डॉ. लोढा यांच्या संपर्कात पूर्वीपासूनच राहिले. डॉ. लोढा यांनी नियोजनापासून सर्व कार्यक्रमाच्या आखणीत मदत केली. आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या तिन्ही दिवसांत आयोजकांना आलेल्या अनेक छोट्यामोठ्या अडचणी डॉ. लोढा यांनी सोडविण्यास सहकार्य केले. डॉ. लोढा यांचे या धम्मपरिषेतील योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले. या योगदानासाठी आयोजनसमितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता ‘‘वणी बहुगुणी’’सोबत बोलताना व्यक्त केली. आयोजन समितीचे अध्यक्ष दीपक पुडके, विक्की इंगळे, रोहण साव, अंकुश पेठकर, बाळा सोनटक्के, प्रवीण खानझोडे, अॅड. राहुल खापर्डे, राधा दुर्गमवार, सुनीता डेकाटे, प्रणिता धुर्वे, अश्विनी जंगले यांनी ‘‘वणी बहुगुणी’’जवळ आपल्या भावना व्यक्त केल्यात.