डॉ. दाभोलकर स्मृतिदिनाला माकपचे देशव्यापी आंदोलन
वणीतही एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
जब्बार चिनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यात स्मृतिदिनानिमित्त देशव्यापी आंदोलन केले. डॉ. दाभोलकर, अन्य पुरोगामी लेखक आणि विचारवंत यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना पकडण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचा जाहीर निषेध केला. त्यांच्या मारेकऱ्यांना व सूत्रधारांना ताबडतोब अटक करावी आणि अन्य शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या आणि सामान्य जनतेच्या मागण्या वणी शाखेने मुख्यमंत्र्यांना केल्यात. तसे निवेदन त्यांनी एसडीओंमार्फत केले.
पुढील मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर, कॉ पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारांना ताबडतोब अटक करावी. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी. पेट्रोल-डिझेल व गॅसचे भाव निम्याने कमी करावेत. केंद्रसरकाराचे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे.
ऑनलाईन शिक्षणपद्धती रद्द करावी. शेतीपंपाचे व घरगुती वीजबिल माफ करावे. सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे बंद करावे. शेतकरी विरोधी अध्यादेश मागे घ्यावा. २०२० चे वीज विधेयक रद्द करावे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या कंपन्यांना रोखावे. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळेस कॉ. शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके, विप्लव तेलतुंबडे, गजानन ताकसांडे, संजय कोडापे, अमोल चटप, वामन बोबडे आदी उपस्थित होते.