बहुगुणी डेस्क, वणी: अत्यंत प्रतिष्ठित असा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ठ संशोधक राष्ट्रीय पुरस्कार प्रा. डॉ. रेखा म .बडोदेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनद्वारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी डॉ. संदेश वाघ, डॉ. संतोष बनसोड, दिल्ली येथील डॉ. अजित कुमार, डॉ.आशीष मालू, डॉ. संदीप डोंगरे व अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. रेखा मनोहर बडोदेकर ह्या स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालयात इतिहास विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, संशोधन, संशोधन संदर्भ ग्रंथ, तसेच सामाजिक क्षेत्रांतील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ. बडोदेकर यांच्या ” विदर्भ मे आंबेडकरी आंदोलन मे दलीत महिलाओ का योगदान ” ह्या पुस्तकाचे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते ह्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ह्यापूर्वी त्यांंची तीन पुस्तकें प्रकाशित झालेली आहे. ” विदर्भातील आंबेडकरी चळवळीत दलीत महिलांचे योगदान…”, ”किसान आंदोलन : ऐतिहासिक दृष्टिसे…”, ”भारतीय इतिहास मे महिलाये” अशी ही पुस्तके आहेत. नुकताच त्यांना सावित्रीच्या लेकी हा राज्यस्तरीय पुरस्कार, इंडियन स्टुडंट्स कौन्सिल व महाराष्ट्र संचालनालय पुरातत्व विभाग पुणेच्या वतीने प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या या यशाबद्दल आंबेडकराईट हिस्ट्री असोसिएशनसह सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments are closed.