प्रा. सुनिता मकरंद यांना पीएच.डी प्रदान
नुरजहा बेगम महाविद्यालयात प्रा. सुनिता या हिंदी विभाग प्रमुख
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुनिता मकरंद यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची पीएच.डी प्रदान करण्यात आली. “प्रातिनिधीक हिंदी नाटकों में प्रमुख स्त्री पात्रो का चरित्रगत अध्ययन”या विषयावर त्यांनी शोध प्रबंध सादर केला. मार्गदर्शक डॉ.रवींद्रकुमार शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना पीएच. डी प्रदान केली. ते आपले यशाचे श्रेय डॉ.रझ्झाक अहमद व डॉ. राणानूर सिद्दिकी तसेच प्राचार्य डॉ. रोहित वनकर, रघुनाथ मकरंद, यशोदा मकरंद, प्रा.अरुण अंभोरे, सुभाष अंभोरे, लोमेश अंभोरे, संगीता मकरंद उपायुक्त, युवराज पडियार सहा.कामगार आयुक्त, सुमन मोरे, पंजाबराव मोरे, रंजना अंभोरे, संगीता अंभोरे, प्रा.दीपक गवई, प्रा. वैशाली दारोकार, प्रेमिला सूर्यदास वाघमारे यांना देतात. त्यांच्या या यशाबाबत डॉ.रज्जाक अहमद, डॉ. राणानूर सिद्दिकी व प्राचार्य डॉ. रोहित वनकर, रुबिना सिद्दीकी, अलबिना सिद्दीकी (अमेरिका) यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments are closed.