आज सकाळी वणीत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. सुरेश चोपणे यांचे व्याख्यान

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज रविवारी दिनांक 15 मे रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिर, टागोर चौक येथे सकाळी 9:30 वाजता सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व पर्यावरण प्रेमी प्रा. डॉ. सुरेश चोपणे यांचे पर्यावरण या विषयावर  व्य़ाख्यान आयोजित करण्यात आले आहे. तर पर्यावरण प्रेमी राजू पिंपळकर ग्लोबल वार्मिंग या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. डॉ. सुरेश चोपणे हे ग्रीन प्लानेट सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष असून ते पर्यावरण मंत्रालय नवी दिल्ली याचे सदस्य देखील आहेत. एक पर्यावरण प्रेमी, खगोल, ऑर्कॉलॉजिस्ट तज्ज्ञ म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विजयबाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनात आणि स्माईल फाउंडेशनच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला वणीतील पर्यावरणप्रेमींनी व वणीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांनी केले आहे.

Comments are closed.