दुर्भा गावातील नागरिकांनी केले गावबंदी

गावकऱ्यांच्या सुरक्षेकरीता सरपंचाने उचलले पाऊल

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील शेकडो तरुण तरुणी कोरोना बाधित शहरातून तालुक्यातील अनेक गावात परतत आहे. कोरोनाची लागण दुर्भा गावातील जनतेला होऊ नये याची खबरदारी घेत दुर्भा (नवीन) येथे २४ मार्च रोजी मंगळवारी कोरोनाच्या संसर्गाच्या बचावासाठी पासून गावातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गावातील संपूर्ण रस्त्यावर बांध घालून “गावबंदी” करण्यात आली.

हे कार्य गावातील प्रथम नागरिक सरपंच सतीश नाकले यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यात त्यांना हरिदास गुर्जलवार, प्रवीण बद्दमवार, सतीश आदेवार, अमोल भेदोडकर, सुहास भेदोडकर, नरेंद्र नाकले, नितीन नाकले, अंकुश नन्नुरवार, गजानन राखुंडे, राकेश नन्नुरवार, संजय पवार, नरेश अडपावार, देवराव टेकाम व मुत्तन्ना मेडपटलावार यांनी सहकार्य केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.