ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात दुर्गा विसर्जन शांततेत पार पडले. तालुक्यात १०५ दुर्गा मंडळाना पोलिसांनी रितसर परवानगी दिली होती, मारेगांव शहरात १२ दुर्गोत्सव मंडळ स्थापन होते, गेल्या दहा दिवसात तालुक्यात व मारेगाव शहरात दुर्गा उत्सवात दरम्यान कोणताच अनुचित प्रकार घडला नाही,त्यामुळे तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल्याने पोलिसानी सुटकेचा निश्वास सोडला.
समाजातील प्रत्येक घटक उत्सव प्रिय असल्याने सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळात गेल्या दहा दिवसात अत्यंत उत्साहात रात्रीच्या दरम्यान तालुक्या सह शहरातील मंडळामधे कुठे लोकप्रबोधनाचे कार्यक्रम तर कुठे मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन दुर्गा मंडळाने केल्याची माहिती मिळाली.
या दरम्यान महत्वाचे म्हणजे मारेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अमोल माळवे यांनी तालुक्यातील सर्व दुर्गा देवी मंडळाना कायदा व सुव्यवस्था कुठेही भंग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक मंडळाना दिली,त्यामुळे तालुक्यातील जनतेचे सहकार्य व पोलीस विभागाची कायदा व सुव्यवस्था या संदर्भात दुर्गोत्सव मंडळाच्या कार्यक्रत्यांचा समन्वय यामुळे तालुक्यात. दुर्गादेवी विसर्जन शांततेत झाले.
शहरातील. फक्त पोलिस स्टेशनची देवी सोडून, सर्व देवीचे विसर्जन एकाच दिवशी ठेवल्याने विसर्जनाचा शेवटचा टप्पा शांततेत पार पडला आहे, तसेच देवी विसर्जनाचा दिवस बाजाराचा असल्याने मारेगावचा आठवडी बाजार देवी विसर्जन शांततेत पार पडावे म्हणून मंगळवारचा आठवडी बाजार बुधवारला भरला. त्यामुळे देवी विसर्जन कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडले.