मारेगाव कोरंबी या ग्रामीण भागातही झूम मिटिंगद्वारे शिक्षण सुरू

गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकार्‍यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन

0

जब्बार चीनी, वणीः मारेगाव (कोरंबी) येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळा शाळेत ऑनलाईन मार्गदर्शन चालू आहे. कोरोनाच्या महामारीत शाळा बंद आहेत. या परिस्थितीत शिक्षण सुरु ठेवण्याचे कार्य येथील सर्व शिक्षक आपआपल्या पद्धतीने ऑनलाईन वर्ग घेऊन करीत आहेत. गुरुवारी नागोराव ढेंगळे यांनी सहाव्या आणि सातव्या इयत्तेच्या इंग्रजी विषयासाठी झूम वर्गाचे आयोजन केले. ह्या वर्गास पं.स.वणीच्या कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी स्नेहलता आंबटकर आणि विस्तार अधिकारी नवनाथ देवतळे उपस्थित होते. आंबटकर यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला. नियमित होत असलेल्या ऑनलाईन वर्गातून अडचणी आणि उपाययोजनांवप चर्चा केली. शिक्षकांनी शिकवलेल्या विषयांचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होते काय याची पडताळणी केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले. नियमित अभ्यास करण्याच्या महत्त्वाच्या टीप्स दिल्यात.

आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवून अध्ययनासाठी पालकांनी ऍड्राईड फोन्स उपलब्ध करुन दिलेत. देवतळे यांनी या प्रयत्नांबद्दल सर्व पालकांचे अभिनंदन करीत आभार मानलेत. वर्गातील विद्यार्थ्यांलीदेखील अधिकार्‍यांशी चर्चा करून शंकानिरसन केले. झूम मिंटिंगला अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याचा हा कदाचित जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असावा. मान्यवरांच्या सक्रिय उपस्थितीमुळे व मार्गदर्शनामुळे शिक्षकांत आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापुढे विषयतज्ञ म्हणून काम करणारे बी.आर.सी.चे साधनव्यक्ती आणि जिल्ह्यातील पं.स.चे विषयतज्ज्ञ यांनाही या ऑनलाईन वर्गात पाचारण करण्याचे नियोजन सुरू आहे. वर्गात विविधता आणून वर्ग कसे रजंक करता येतील याचाही प्रयत्न सुरू आहे.

वेगवेगळ्या पद्धतीने विषयाची सखोल माहिती विद्यार्थ्यांनी कशी देता येईल याचेही नियोजन सुरू आहे. आॅन लाईन वर्गात उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्यांचे आभार मानण्यात आलेत. ही माहिती मुख्याध्यापक अरविंद गांगुलवार यांनी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.